By  
on  

'लागीर झालं जी' मधील शितली फेम अभिनेत्री शिवानी बावकरला कोरोनाची लागण

देशभरात सध्या कोरोनाने थैमाल घातला आहे. कोरोनाची दुसरी लाट आली असून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. यातच मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. बॉलीवुडसह अनेक मराठी कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अनेक कलाकारांच्या कोविड चाचणी पॉजिटिव आल्या आहेत. अभिनेत्री शिवानी बावकरलाही कोरोनाची लागण झाल्याचं तिने सोशल मिडीयावर सांगीतलंय. 

शिवानीने नुकतीच कोरोना चाचणी केली आहे. त्यानंतर तिची चाचणी पॉजिटीव आली आहे. सर्व काळजी आणि खबरदारी घेऊनही कोरोनाची लागण झाल्याचं शिवानी सोशल मिडीयावरील पोस्टमधून सांगतेय. शिवानी सांगते की, "सर्व काळजी आणि खबरदारी घेऊनही, दुर्दैवाने माझी कोविड-19 चाचणी पोझिटीव आली आहे. सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करत, मी माझ्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार औषधोपचार करीत आहे. मी सर्वांना विनंती करते की कृपया अतिरिक्त खबरदारी घ्या आणि आवश्यक असल्यासच बाहेर पडा. सुरक्षित रहा आणि निरोगी रहा. भेटू लवकरचं! खूप प्रेम... शिवानी बावकर"

तेव्हा सध्या कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने काळजी घेण्याचा सल्ला शिवानी देत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी घरातच क्वारंटाईन होऊन कोरोनावर माती केली आहे. 

'लागीर झालं जी' या मालिकेत शिवानीने शितलीची भूमिका साकारली होती. ही मालिका प्रचंड प्रसिद्ध झाली. शिवानीने शितलीचं पात्र उत्तम वठवलं होतं. हेच शितलीचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive