By  
on  

सुमित्रा भावे यांच्या निधनानंतर अमृता सुभाषने व्यक्त केली हळहळ

प्रसिद्ध दिग्दर्शिका, निर्मात्या सुमित्रा भावे यांचं 19 एप्रिल रोजी निधन झालं. पुण्यातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्ठी हळहळली. एक प्रतिभावंत दिग्दर्शिक आणि माणूस गमावल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. त्यांच्या जाण्यानं सिनसृष्टीचं मोठं नुकसान झालं आहे. 

अभिनेत्री अमृता सुभाषने सुमित्रा भावे यांच्यासोबत बऱ्याचदा काम केलं आहे. त्यांच्याच लघुपटातून अमृताचं पदार्पण झालं होतं. सुमित्रा यांच्या निधनाने अमृतालाही मोठा धक्का बसला आहे. हे दु:ख अमृताने सोशल मिडीयावर व्यक्त केलं आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने ती उद्धवस्त झाल्याचं या पोस्टमध्ये सांगतेय.

 

अमृता लिहीते की, "उध्वस्त आणि ताकदवान एकाच वेळी वाटू शकतं? शकतं. मला आज वाटतं आहे. सुमित्रामावशी गेली. पण जाताना हे शिकवून गेली आहे मला. प्रत्येक उध्वस्तापुढे पाय रोवून उभं रहायला.तिच्या लघुपटातनं पदार्पण झालं माझं. किती काय दिलं तिनं मला आणि कुणाकुणाला याची मोजदादच नाही. मावशी.."

'चाकोरी' हा लघुपट आणि 'आस्तु' या सिनेमाच्या निमित्ताने अमृताने सुमित्रा भावे यांच्यासोबत काम केलेलं आहे. अमृतासह अनेक कलाकारांनी सुमित्रा यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त केली आहे आणि सोशल मिडीयावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive