By  
on  

पाहा Video : असा आहे रिंकू राजगुरुचा नवा लुक, शॉर्ट हेअरकटमध्ये केला असा सुंदर व्हिडीओ

अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. 'सैराट'ची आर्ची म्हणून प्रसिद्ध असलेल्या रिंकूचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मिडीयावरील तिचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. त्यातच रिंकूने आणखी एक व्हिडीओ शेयर केला आहे.

रिंकूने नुकताच नवा हेअरकट केला आहे. या हेअरकट मधील रिंकूचा नवा लुक तिने फोटोंच्या माध्यमातून शेयर केला आहे. या फोटोंमध्ये रिंकूचा सुंदर लुक पाहायला मिळतोय. 

 

या शॉर्ट हेअर लुकमध्ये रिंकूने सुंदर व्हिडीओही केलाय. ओ रे पिया या गाण्यावर रिंकूचा हा व्हिडीओ आता पसंत केला जातोय.

 

गुलाबी रंगाचा टीशर्ट आणि कानात गुलाबाचे फुल अडकवले आहे. रिंकूच्या या हटके लुकने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. 

'सैराट'नंतर रिंकू ही 'कागर', 'मेकअप' या मराठी सिनेमांमध्ये झळकली. 'हंड्रेड' या वेबसिरीजमधून रिंकूने ओटीटीवर पदार्पण केलं. त्यानंतर 'अनपॉज्ड' या ओटीटी फिल्ममध्येही ती झळकली. लवकरच आठवा रंग प्रेमाचा या आगामी सिनेमात रिंकू झळकणार आहे. याशिवाय छूमंतर या द्विभाषिक सिनेमाचं चित्रीकरण रिंकूने भारताबाहेर केलं आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive