सध्या देशात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्ण संख्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. तरी वॅक्सिन उपलब्ध असल्याने अनेक जण कोरोनापासून बचाव करण्यासाठी ही लस घेत आहेत. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी ही लस घेतली आहे. काही कलाकारांनी सोशल मिडीयावर लस घेतल्याची माहिती शेयर केली आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही नुकतीच कोरोनाची लस घेतली आहे. सोनालीने ट्विटरवर याविषयी माहिती दिली. सोनाली लिहीते की, "वॅक्सिनेशनचा पहिला डोस घेतला. यासाठी जवळपास दोन तास लागले. अत्यंत संयोजित, शिस्तबद्ध वातावरण, मदत करणारे स्वयंसेवक आणि मेडिकल स्टाफ. कृपया उशीर करू नका. तुमचं वॅक्सिनेशन आत्ताच नोंदवा"
First dose of vaccine done
Took us 2 hours overall. Extremely organised, disciplined atmosphere, helpful volunteers n medical staff
Please don’t delay, book your vaccination appointment on priority. #GetVaccinated #COVID19Vaccination pic.twitter.com/V5Y4nYnsqr— sonalikulkarni (@sonalikulkarni) April 20, 2021
सोनालीने या लसीकरणाचे फोटो शेयर करत मेडिकल स्टाफचही कौतुक केलं आहे.