By  
on  

पाहा Video : सिद्धार्थ चांदेकरला आवरला नाही या प्राण्याला जवळ घेण्याचा मोह, शेयर केली खास आठवण

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरला फिरण्याची प्रचंड आवड आहे. शिवाय पत्नी अभिनेत्री मिताली मयेकरलाही फिरण्याची आवड आहे. त्यामुळे दोघं लग्नाआधीही विविध ठिकाणी फिरायचे. दोघांनी कोरोना विषाणूचा फैलाव होण्याआधी ऑस्ट्रेलिया ट्रीप केली होती. या ट्रीपचे काही क्षण त्यांनी सोशल मिडीयावर शेयर केले होते.

नुकतच सिद्धार्थने याच ट्रीपमधील खास क्षण सोशल मिडीयावर शेयर केला आहे. यावेळी सिद्धार्थ चांदेकरची भेट झाली कुआला या प्राण्याशी. प्राण्यांची आवड असलेल्या सिद्धार्थला मग या प्राण्याला जवळ घेण्याचा मोह आवरला नाही. सिद्धार्थने त्याला जवळ घेतले आणि त्याच्यासोबत फोटोही क्लिक केले. याचदरम्यानचा व्हिडीओ सिद्धार्थने शेयर केला आहे.

 

सिद्धार्थच्या या व्हिडीओला प्रचंड लाईक्सच मिळाले आहेत. सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत सिद्धार्थने ही गोड आठवण शेयर करून अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं असेल एवढं नक्की. सिद्धार्थने या पोस्टला गमतीशीर कॅप्शनही दिलय. तो लिहीतो की, "हम कोआला है तो क्या हुआ दिलवाले है"

याचवर्षी जानेवारी महिन्यात सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या दोघांनी लगीनगाठ बांधली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive