By  
on  

अभिनेत्री संस्कृती बालगुडेने चक्क काढलं या प्रसिद्ध व्यक्तिचं चित्र

अभिनेत्री संस्कृती बालगुडे ही एक उत्तम अभिनेत्रीसह उत्तम नृत्यांगना देखील आहे. अनेक पुरस्कार सोहळ्यात संस्कृतीचे एकापेक्षा एक डान्स पाहायला मिळाले आहेत. मात्र नृत्याव्यतिरिक्त आणखी एका गोष्टीची संस्कृतीला प्रचंड आवड आहे. हा कलागुण म्हणजे चित्रकारी. संस्कृती ही उत्तम चित्र रेखाटते. संस्कृतीने सोशल मिडीयावर अनेकदा तिचे विविध चित्रे शेयर केले आहेत.

संस्कृतीने नुकतच तिने काढलेलं खास चित्र शेयर केलं आहे. खास यासाठी कारण हे चित्र एका खास व्यक्तिचं आहे. ही व्यक्ती म्हणजे राणी डायना. प्रिन्सेस डायना आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक चाहते आहेत. संस्कृतीही त्यांपैकी एक. म्हणूनच संस्कृतीने डायना यांचे सुंदर चित्र काढले आहे. 

 

संस्कृती या पोस्टमध्ये लिहीते की, "मला माहिती नाही की मला याआधी यांचं चित्र काढण्याचं लवकर का सुचलं नाही. या प्रिन्सेस डायना तुमच्यासाठी.. त्यांच्या रेवेन्ज ड्रेसमध्ये. काही वर्षांपासून मला या उल्लेखनीय महिलेने तिच्या या सौंदर्याने आश्चर्यचकीत केले आहे. आशा आहे तुम्हाला हे आवडेल."

राणी डायना या अनेक महिलांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि मोहक सौंदर्याने त्यांनी जगभरात लक्ष वेधलं होतं. याचं राणीने संस्कृतीलाही प्रभावीत केलं. आणि संस्कृतीने या सुंदर राणीचे सुंदर चित्र काढले आहे. नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी संस्कृतीच्या या चित्राचं कौतुक केले आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive