By  
on  

मराठीतील या फिट अभिनेत्याला कोरोनाची लागण, घरातच केलं क्वारंटाइन

कोरोनाचा फैलाव देशात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यातच नव्या लॉकडाउनचेही नियम जाहिर करण्यात आले आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यात मनोरंजन विश्वातली काही कलाकारांनीही कोरोनाची लागण झाली आहे. हिंदीसह अनेक मराठी कलाकारांचीही कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

नुकतच अभिनेता अशोक शिंदे यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अशोक यांनी सोशल मिडीयावर याविषयीची माहिती दिली आहे. ते सांगतात की, "नमस्कार, मी तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की, सर्व प्रकारची काळजी घेतल्या नंतर ही माझी कोविड 19 चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. खबरदारी म्हणून मी स्वत: ला क्वारंटाइन केले आहे आणि माझे औषधोपचार सुरु केले आहेत. मी सर्वांना विनंती करतो, गेल्या 15 दिवसात जे माझ्या संपर्कात आले कृपया स्वत:ची चाचणी करुन घ्या. काळजी घ्या सुरक्षीत रहा."

एक फिट अभिनेता म्हणून अशोक शिंदे यांची ओळख आहे. तेव्हा कोविड होऊ नये या दृष्टीने त्यांनीही विविध काळजी घेतली. तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते घरात क्वारंटाइन असून या पोस्टद्वारे सगळ्यांना काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive