अभिनेता भूषण प्रधानने नुकतच सोशल मिडीयावर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याला चाहत्यांनी विविध प्रश्ने विचारली. यामध्ये भूषणचं टोपण नाव काय आहे ?, भूषण लग्न कधी करतोय " यासारखे अनेक प्रश्न विचारले जात आहे. यात त्याची खास मैत्रीण संस्कृती बालगुडे विषयी ही प्रश्न विचारला गेला. भूषण आणि संस्कृती सोशल मिडीयावर किंवा इन्स्टाग्रामवर एकमेकांना फॉलो का करत नाही याविषयी प्रश्न विचारले गेले. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भूषणने दिली आहेत.
संस्कृतीविषयी विचारलेल्या प्रश्नाचं उत्रर भूषणने असं दिलं की, "बिट्टा आणि माझं बॉंडिंग कायमचं आहे. आम्ही अनेकदा लहान मुलांसारखे भांडलोय, आणि अनेकदा एकमेकांना अनफॉलो केलय. त्यानंतर मग अखेर आम्ही दोघांनी सोशल मिडीयावर एकमेकांना फॉलो न करण्याचं ठरवलं. तरीही आमचं बाँड कायम राहील. हा आम्ही या वर्षी क्लिक केलेला आत्ताचा फोटो आहे."
या स्टोरी पोस्टमध्ये भूषणने संस्कृतीसोबतचा रिसेन्ट फोटो देखील शेयर केला आहे. भूषण आणि संस्कृती यांची मैत्री तुटली की काय असं चाहत्यांना वाटत होतं, मात्र भूषणने ही पोस्ट करून या चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. शिवाय भूषण हा संस्कृतीला बिट्टा हे टोपण नाव दिल्याचही पाहायला मिळतय.
'पिंजरा' या मालिकेत भूषण आणि संस्कृतीने एकत्र काम केलं होतं. ही मालिका प्रचंड गाजली होती शिवाय भूषण-संस्कृतीची जोडीही पसंत केली गेली होती. या मालिकेनंतर दोघं अनेक मराठी सिनेमांमध्येही झळकले आहेत. 'निवडुंग', 'शिव्या', 'रे राया' या सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र काम केले आहे.