दोन वर्षांपूर्वी या मालिकेने वेधलं होतं सगळ्यांचं लक्ष, कलाकारांनी शेयर केली आठवण

By  
on  

विविध वाहिन्या आणि त्यावर प्रेक्षकांसाठी विविध मालिका आणि कार्यक्रम पाहायला मिळतात. यातच नवनवीन विषय आणि कहाण्या या मालिकांमधून पाहायला मिळतात. दोन वर्षांपूर्वी अशीच एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 'जीवलगा' असं या मालिकेचं नाव होतं. या मालिकेत अभिनेता स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर आणि मधुरा देशपांडे हे कलाकार झळकले होते. 

याच मालिकेला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कलाकारांनी या मालिकेच्या आठवणी शेयर केल्या आहेत. सिद्धार्थ चांदेकरने या मालिकेच्या लाँच दरम्यानचा फोटो शेयर केला आहे. दोन वर्षांपूर्वी ही मालिका जेव्हा लाँच करण्यात आली त्यावेळचा हा फोटो आहे.

 

अभिनेत्री अमृता खानविलकरने या मालिकेत काव्या ही व्यक्तिरेखा साकारली होती. ही काव्या साडी लुकमध्ये दिसायची. या भूमिकेतील पोस्टर्स आणि फोटो अमृताने शेयर केले आहे.

 

अभिनेत्री मधुरा देशपांडेने देखील या मालिकेच्या आठवणीत काही फोटो शेयर केले आहेत.

 

या मालिकेत लग्नबाह्य संबंध हा विषय दाखवण्यात आला होता. या मालिकेच्या प्रोमोची प्रचंड चर्चा झाली होती. स्वप्निल, अमृता, सिद्धार्थ आणि मधुरा यांचे या मालिकेसाठी करण्यात आलेले प्रोमो लक्षवेधी ठरले होते.

Recommended

Loading...
Share