By  
on  

अमित मिस्त्री आणि सुमीत राघवनची होती खास मैत्री, मित्राच्या निधनाने सुमीतला बसला धक्का

अभिनेता अमित मिस्त्री याचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. अमित यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. अमित यांच्या अशा अचानक जाण्यानं त्यांच्या निकटवर्तीयांना मोठा धक्का बसला आहे. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी अमित यांच्या जाण्यानं दु:ख व्यक्त केलं आहे. अभिनेता सुमीत राघवनने अमित यांच्यासोबत काम केले आहे. त्यामुळी सुमीत राघवनलाही मोठा धक्का बसला आहे.

सुमीतने सोशल मिडीयावर पोस्ट शेयर करून दु:ख व्यक्त केलं आहे. सुमीत लिहीतो की, "जवळच्या मित्राच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. आम्ही काही वेड्यासारख काम केलं आहे. गुजराती नाटकांसाठी जग फिरलो आहे. असंख्य म्युझीक सेशन केले आहेत. मजा, हसणं आणि आज तो या जगात नाही. अमीतला ह्रदयविकाराचा झटका आला. होय आपल्या सगळ्यांना मृत्यूला सामोरं जायचय पण हे खूप जास्त झालं."

 

 सुमीत आणि अमित यांनी गुजराती नाटकांसाठी एकत्र काम केले आहे. याशिवाय दोघांची चांगली मैत्री होती. म्हणूनच अमितच्या निधनाने सुमीतला मोठा धक्का बसला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive