By  
on  

अमृता सुभाषने शेयर केली भूतकाळातल्या या सुंदर दिवसाची आठवण

अभिनेत्री अमृता सुभाष ही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोशल मिडीयावरील तिच्या चाहत्यांसाठी, फॉलोअर्ससाठी अमृता विविध पोस्ट करते. या पोस्टमध्ये अमृताच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्टी आणि काही खास आठवणीही पाहायला मिळतात. अमृताने नुकतीच एक खास आठवण शेयर केली आहे. ही आठवण आहे. अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक शाह यांच्यासोबतची.

अमृताने नसीरुद्दीन शाह आणि रत्ना यांच्यासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. अमृता या पोस्टमध्ये सांगते की, "भूतकाळातल्या या सुंदर दिवसाची आठवण आज मला थोडी शांतता देते आहे. माझा मामे भाऊ सुधन्वा देशपांडे याच्यामुळे हा दिवस मी अनुभवला. त्याचं पुस्तक हल्ला बोल आता पाॅडकास्टवर येत आहे. काल त्याचा पहिला एपिसोड रिलीज झाला. यामधे सुधन्वाबरोबरच नसीर सर, रत्नामावशी यांचेही आवाज आहेत. मी माझी मामी कालिंदी देशपांडे हिनं लिहीलेला लेख या मधे वाचला आहे. याचं रेकाॅर्डींग आम्ही केलं तो हा दिवस.आज जागतिक पुस्तक दिन आहे. त्यानिमित्तानं भूतकाळातलं हे पुस्तकवाचन आठवलं. पुस्तकं नेहमीच मला मोलाचा आधार देत आली आहेत. आत्ताच्या या काळात तर अनेक पुस्तकं माझी समजूतही घालत आहेत. आजच्या या दिनी माझ्या आयुष्यातल्या सर्व पुस्तकांप्रति कृतज्ञता. माझे हे मूक पण बोलके सुह्रुद..माझे सच्चे दोस्त. मी त्यांची ऋणी आहे."

पुस्तक दिनाच्या निमित्ताने अमृताने ही खास आठवण शेयर केली होती. पॉडकास्ट रेकॉर्डिंग दरम्यानची ही आठवण आहे. या पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये अमृता सुभाषसह तिचा मामे भाऊ सुधन्वा देशपांडे, अमृताचे पति संदेश कुलकर्णी, नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक शाहही दिसत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive