By  
on  

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार जाहीर.. नाना पाटेकर, शर्मिला टागोरसह कला विश्वातील दिग्गजांना पुरस्कार

नुकतीच मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे 2020 या वर्षा साठीचे हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात अभिनयासाठी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, नाना पाटेकर  आणि प्रेम चोपडा यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यात ज्येष्ठ कवी-गीतकार संतोष आनंद, ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा, ज्येष्ठ संगीतकार मीना खडिकर, ज्येष्ठ गायिका-संगीतकार उषा मंगेशकर यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

अनेक वर्षांपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने हा मानाचा पुरस्कार दिला जातो. संगीत, समाजसेवा, रंगभूमी, साहित्य, चित्रपट, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मानित करण्यात येतो.

तर वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. प्रतित समाधानी, डॉ. अश्विन मेहता, डॉ. राजीव शर्मा, डॉ. जनार्दन निंबाळकर, डॉ. निशित शहा यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले. तर वृत्तपत्र पत्रकारितेत दै.सामनाचे कार्यकारी संपादक शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनाही हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.  एक लाख अकरा हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरुप आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive