By  
on  

'माझ्या नवऱ्याची बायको' मधील या अभिनेत्रीने बहिणीच्या वाढदिवसाला दिलं हे खास सरप्राईज

आपल्या कुटुंबातील सदस्याचा वाढदिवस साजरा करणं यापेक्षा दुसरा आनंद कोणता असू शकतो. त्यातच बहिण-भावाच्या वाढदिवसासाठी काही सरप्राईज प्लॅन करण्याची मजाही काही वेगळीच असते. नुकतच अभिनेत्री रुचिरा जाधवनेही असं केलय. आपल्या बहिणीसाठी तिने खास सरप्राईज प्लॅन केलं. 

रुचिराची बहीण ऋतुजाचा वाढदिवस नुकताच झाला. या वाढदिवसासाठी रुचिराने खास सरप्राईज प्लॅन केलं होतं. बहिणीच्या वाढदिवसासाठी खास सजावट, केक अशा अनेक गोष्टी तिने प्लॅन केल्या होत्या. हे पाहुन बहिणीला प्रचंड आनंद झाला आहे.

रुचिराने या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे खास फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. याशिवाय नुकताच रुचिराच्या बहिणीचा साखरपुडा देखील झाला आहे. तेव्हा रुचिराच्या बहिणीचा माहेरी साजरा होणारा हे शेवटचा वाढदिवस असल्याचही ती या पोस्टमध्ये म्हणतेय. बहिणीचा साखरपुडा झाल्यानंतर रुचिराचा साखरपुडा झाल्याचं अनेकांना वाटलं होतं. यासाठी रुचिराला शुभेच्छा देण्यात आल्या, तश्या बातम्याही करण्यात आल्या होत्या. मात्र रुचिराने नंतर एका सोशल मिडीया पोस्टमधून तिचा नाही तर बहिणीचा साखरपुडा झाल्याचं स्पष्ट केलं. पोस्टमधील कॅप्शन न वाचता अनेकांनी हा गोंधळ निर्माण केला होता.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ruchira Jadhav (@ruchira_rj)

 

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत रुचिरा मायाच्या भूमिकेत झळकली होती. लवकरच 'बाबू' या आगामी मराठी चित्रपटातही रुचिरा झळकणार आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive