सध्या राज्यासह देशभरात कोरोनाचं सावट पसरलय. यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटीने थैमान घातलय. सथ्याच्या बिकट परिस्थितीत अनेकांना धीर देण्यासाठी विविध सकारात्मकही पोस्टही सोशल मिडीयावर केल्या जात आहेत. शिवाय सोशल मिडीयाचा वापर करुन अनेकांना मदतीचा हात पोहोचतोय. यात मनोरंजन विश्वातील कलाकार पुढाकार घेताना दिसत आहेत.
एखादी सकारात्मक पोस्ट किंवा विचारही परिणाम करु शकतात या उद्देशाने अनेक जण सोशल मिडीयाचा उपयुक्त वापर करत आहेत. यातच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत प्राजक्ता शेतीची कामं करताना दिसत आहे. सध्या कोरोनाचं संकट आलं असलं तरी शेतकऱ्यांचं उदाहरण देत आहे.
प्राजक्ता लिहीते की, "आपल्या भोवती #corona चा अंधार दाटला असला तरी देखील घाबरू नका... स्वतः वर विश्वास ठेवा. जगाचा पोशिंदा असलेल्या त्या शेतकऱ्याकडे बघा... कितीही संकट आली तरी तो कधीच थांबत नाही... म्हणूनच आपण जगू शकतो..."
सध्याच्या परिस्थितीत अनेक जण घाबरले आहेत. मात्र जगाचा पोशिंदा शेतकऱ्याचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून या संकटाचा सामना करण्याचा धीर प्राजक्ताने या पोस्टमधून दिला आहे.