By  
on  

धक धक गर्ल माधुरीचे हे 5 ग्लॅमरस लुक्स पाहून तुम्ही व्हाल फिदा!

अभिनेत्री माधुरी दिक्षीत म्हणजे लाखों दिलो कीं धडकन. आपल्या बेधडक अदा आणि अभिनयाने सिनेसृष्टीत अधिराज्य गाजवणारी ही एक सौंदर्यवती अभिनेत्री आहे. माधुरीची एक झलक आणि स्मित हास्य पाहण्यासाठी चाहते आतुरलेले असतात.

माधुरी दिक्षीत सध्या कलर्स वाहिनीवरील डान्स रिएलिटी शो ‘डान्स दिवाने’चे परीक्षण करताना दिसून येत आहे. या स्पर्धेतील सर्वच स्पर्धक अप्रतिम परफॉर्मन्स देत असून या मुलांनी सर्वांचीच मनं जिंकली आहेत. तसंच स्पर्धकांसोबतच माधुरीसुध्दा आपल्या अप्रतिम सौंदर्य अविष्काराने सर्वांचे लक्ष वैधून घेत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने माधुरीचे डोळ्यांचे पारणे फेडणारे विविध अवतार आपल्यासमोर येत आहेत.

चला तर मग पाहूयात माधुरीचे 5 लूक्स, ज्यामुळे तुम्ही नक्कीच फिदा व्हाल.

डान्स दिवानेच्या फ्लोरसाठी मोनिका आणि करिश्माद्वारे डिझाईन केलेली काळ्या रंगाची ही साडी माधुरीवर अगदी खुलून दिसते आहे.

अनिता डोंगरेने डिझाईन केलेला हा पिवळ्या रंगाचा लेहंगा माधुरीच्या सौंदर्याला चार चांद लावतो आहे.

मिकी कॉंट्रेक्टरद्वारे डिझाईन केलेली निळ्या रंगांची या साडीमध्ये माधुरी फारच सुंदर दिसतेय.

वरुण आणि निधिकाद्वारे डिझाईन केलेल्या या अनारकली ड्रेसमध्ये माधुरी खुप गोड दिसतेय.

सुरेखा जैनच्या या कलेक्शनमध्ये माधुरी सर्वांवरच भुरळ पाडते आहे.

माधुरी सिनेमात अभिनय करण्याबरोबरच काही सिनेमांची निर्मितीसुध्दा करतेय. तसंच आपल्या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून ती नवीन कलाकार आणि प्रतिभेला संधी देणं पसंत करतेय. माधुरीमे नुकताच ‘बकेट लिस्ट’  या मराठी सिनेमात नायिका म्हणून झळकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive