By  
on  

Maharashtra Day : महाराष्ट्र दिनी अभिनेता सिद्धार्थ जाधवचा कोरोना वॉरियर्सना सलाम

शूरविरांच्या पराक्रमांनी नटलेल्या या महाराष्ट्रात सध्या कोरोना नावाच्या शत्रने हल्ला केला आहे. मात्र या संकटात महाराष्ट्रही या कोरोनाशी दोन हात करुन महाराष्ट्राचे नागरीक आणि फ्रंटलाईन वर्कर्स मोठ्या प्रमाणात कोरोनाविरुद्ध लढा देत आहेत. आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्ताने अनेकांनी या कोरोना वॉरियर्सना मानाचा मुजरा केला आहे.

अभिनेता सिद्धार्थ जाधवशी पिपींगमून मराठीने संवाद साधला. यावेळी त्याने महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच सध्याच्या परिस्थितीत कोरोना वॉरियर्सच्या योगदानालाही सलाम केलं आहे. 
“या निमित्ताने सध्याच्या परिस्थितीत जे लढा देत असलेले कोरोना वॉरियर्स, त्यात पोलिस, डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी यांच्यासोबत सगळेच फ्रंटलाईन वर्कर्सचे मी आभार मानतो. महाराष्ट्राच्या सर्व नागरीकांचेही आभार मानणं गरजेचं आहे. या सगळ्यात हा नागरीक आपल्या कुटुंबासोबत या कोरोनाशी लढतोय. या सगळ्यांना मी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने सलाम करतो.”

याशिवाय सध्याच्या परिस्थितीत घरीच राहुन कोरोनाशी लढा देण्याचं आवाहन सिद्धार्थने केलं आहे. तो सांगतो की, “सध्या घरीच रहा आणि अनावश्यक बाहेर पडू नका ही विनंती मी सगळ्यांना करतो. सध्या आपण सुरक्षित राहणं आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवणं खूप गरजेचं आहे.  लसीकरण करणही तितकच गरजेचं आहे त्यामुळे लसीकरणासाठी नोंदणी करा. आत्ताच्या परिस्थितीत सकारात्मक राहणं गरजेचं असून आपल्या माणसांची काळजी घ्या.”

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अनेक कलाकारांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातूनही महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण यानिमित्ताने कोरोनाग्रस्त परिस्थितीत काळजी घेण्याचही आवाहन महाराष्ट्राच्या जनतेला केलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive