By  
on  

अभिनेत्री नेहा पेंडसेला शुभेच्छा....नक्की काय गोड गुपित आहे?

मराठीसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाची छाप पाडणारी बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या सोशल मिडीयावरील एका फोटो मुळे चर्चेचा विषय ठरतेय. नेहाने तिच्या बेस्ट बडीजच्या गॅंगसोबत एक छान फोटो नुकताच शेअर केला आहे. यात ती मध्यभागी असून छान लाजताना पाहायला मिळाली तर सोबतच तिची गॅंग म्हणजेच अभिजीत खांडकेकर, श्रृती मराठे, हेमांगी कवी आणि इशा दांडे या सर्व मराठी सेलिब्रिटींचा छान ग्रुप फोटो पाहायला मिळतोय. अभिजीतनेसुध्दा हा फोटो पोस्ट करत, अभिनंदन असं म्हटलं आहे.

हा फोटो आणि कॅप्शन पाहून नेहाचे लग्न किंवा साखरपुडा झाला आहे का असा अंदाज बांधण्यात येतोय. आणि ही गॅंग म्हणजे तिचे जीवाभावाचे मित्र आहेत. त्यामुळे नेमकं असं काय घडलंय याचा उलगडा होण्याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. तर काहींना मात्र तिच्या एखाद्या आगामी प्रोजेक्टविषयीसुध्दा ही पोस्ट असू शकते असे अंदाज वर्तवले आहेत.

 

https://www.instagram.com/p/Bwvn9LbF6kU/?utm_source=ig_web_copy_link

Author

Recommended

PeepingMoon Exclusive