By  
on  

पाहा Video : अमृता खानविलकरच्या सौंदर्याने चांहत्यांवर घातली मोहिनी , सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री अमृता खानविलकरचं सौंदर्य चाहत्यांना कायम मोहिनी घालतं. तिच्या अभिनयासाोबतच तिचं सौंदर्य आणि अदांनी ती चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. सोशल मिडीयावर अमृता मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तिचे फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मिडीयावर चर्चेत असतात. 

अमृता वेस्टर्न आणि पारंपारिक अशा विविध लुकमध्ये सुंदर दिसते. मात्र अमृता साडी लुकमधील फोटो आणि व्हिडीओ विशेषकरुन चर्चेत असतात. असाच एक व्हिडीओ अमृताने सोशल मिडीयावर शेयर केला आहे. सोबतच काही फोटोही शेयर केले आहेत.

 

या व्हिडीओत अमृताने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे त्यावर पिवळ्या रंगाचा ब्लाउज आहे. या लुकमधील अमृताच्या अदांनी चाहत्यांना मात्र घायाळ केलं आहे. एवढच नाही तर अमृताच्या या सुंदरतेवर काही मीम्सही तयार करण्यात आलेत. अमृतानेही या मीम्सची मजा लुटली आहे. सध्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय. मनोरंजन विश्वातील अमृताच्या मित्रमैत्रिणींनीही या व्हिडीओवर कमेंट्स करुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive