By  
on  

पाहा Video : अभिनेत्री अश्विनी भावे म्हणतायत "व्यक्त व्हा.. ", शेयर केला व्हिडीओ

मागील वर्षापासून ते आत्तापर्यंत कोरोना विषाणूने अनेकांचा जीव घेतला. या भयावह संकटाला यावर्षीही सगळे सामोरं जात आहेत. राज्यासह देशात कोरोनाची दुसरी लाट असताना अनेकांना या काळात त्यांचा जीव गमवावा लागतोय. यात मनोरंजन विश्वातीलही अनेक कलाकारांचा समावेश आहे. 

2020 ते 2021 या काळात कोरोना, इतर आजार आणि घटनांमुळे मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी हे जग सोडलं. पण फक्त कलाकारच नाही तर यासोबतच अनेकांनी आपल्या प्रयिजनांना, निकटवर्तीयांना गमावलय. कोरोनाग्रस्त परिस्थितीत अनेकांना त्यांना शेवटचा निरोपही देता आलेला नाही. मात्र अशा काहींसाठी अभिनेत्री अश्विनी भावे यांनी  "व्यक्त व्हा.. " मोहीम सुरु केलीय.

 

अभिनेत्री अश्विनी भावे यांनी नुकताच एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी मनोरंजन विश्वातील ज्या कलाकारांचं या काळात निधन झालं त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सोबतच ज्यांनी आपल्या निकटवर्तीयांना गमावलंय आणि त्यांना व्यक्त व्यायचं असेल तर त्यांच्या पोस्टवर कमेंट करून व्यक्त होण्याचा सल्ला दिलाय. 

त्या या व्हिडीओत म्हणतात की, "मला कल्पना आहे की जसे कलाकार आपण गमावलेत तसे कदाचित तुम्ही तुमच्या परिवारातील लोकं गमावली असतील. कदाचित तुम्हालाही त्यांच्या शेवटच्या क्षणी साथ देता आली नसेल. त्यांना काही सांगायचं राहुन गेलं असेल. तर कुणाचही नाव न घेता या पोस्टखाली तुमचं मत व्यक्त करु शकता."

Author

Recommended

PeepingMoon Exclusive