एखादा पुरस्कार मिळालेला क्षण हा प्रत्येकसाठी महत्त्वाचा असतो. असाच एक महत्त्वाचा क्षण शास्त्रीय गायक महेश काळेच्या आयुष्यात आला होता. महेश काळेला आत्तापर्यंत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलय. पण 2015 मध्ये मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार त्याच्यासाठी कायम खास असेल
नुकतच महेश काळेने सोशल मिडीयावर एक आठवण शेयर केली आहे. ही आठवण याच पुरस्कार सोहळ्याची आहे. 2015 साली 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटातील गाण्यासाठी महेश काळेला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. हीच खास आठवण महेशने शेयर केली आहे. पाच वर्षांपूर्वीची ही आठवण आजही महेश काळेला आनंद देऊन जाते.
महेश लिहीतो की, "पाच वर्षांपूर्वी, तो दिवस, ते वर्ष." या व्हिडीओत महेश यांना पुरस्कार मिळण्याआधी नावाची करण्यात आलेली घोषणा, राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याहस्ते मिळालेला पुरस्कार हे क्षण पाहायला मिळत आहेत. शिवाय या सोहळ्यात महेशने "सूर निरागस हो.." गाणंही मंचावर सादर केलं होतं.