By  
on  

पाहा Photos : लॉकडाऊनमध्ये असा वेळ घालवतेय रिंकू राजगुरु

सध्या कोरोना विषाणूने देशभरात थैमान घातलय. यात महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. ज्यांना घराबाहेर काही काम नाही असे अनेक जण सध्या घरातच आहेत. मात्र या वेळेचा सदुपयोग करत अनेक जण हा लॉकडाऊनचा सदुपयोग करत आहेत.

सैराटची आर्ची म्हणून प्रसिद्ध असेलली रिंकू राजगुरुही सध्या घरातच आहे. मात्र या मिळालेल्या वेळेत रिंकू वाचन करताना दिसत आहे. रिंकूला वाचनाची आवड असल्याने ती विविध पुस्तकं वाचत आहे. शिवाय रिंकूला प्राण्यांची प्रचंड आवड आहे. तिच्या घरी मांजरी देखली आहेत. या माजरींसोबत खेळत वेल घालवायला रिंकूला आवडता. 

सोशल मिडीयावरही रिंकू मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे.  रिंकू बहुदा तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर करते. रिंकूने नुकतेच काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये रिंकू वाचन करताना दिसत आहे. सोबतच ती मांजरींसोबतही खेळताना दिसतेय. रिंकूला प्राणी, पक्षी इतके आवडतात की तिच्या सोशल मिडीयावरही अनेकदा विविध प्राणी, पक्ष्यांचे व्हिडीओ किंवा फोटो पाहायला मिळतात. 

लवकरच रिंकू 'छूमंतर' या द्विभाषिक आणि 'आठवा रंग प्रेमाचा' या सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिंकूच्या या आगामी सिनेमांमधील भूमिका पाहणं लक्षवेधी ठरेल. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive