By  
on  

'हरीओम' चित्रपटाच्या टीमकडून असाही मदतीचा हात

कोरोना या विषाणूमुळे सध्या देशभरात हाहाकार माजला आहे. राज्यासह देशभरात कोरोनाग्रस्त परिस्थितीमुळे सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरु आहे. या काळात अनेकांनी मदतीचा हात पुढे केल आहे. अनेक जम आपआपल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच हरीओम या चित्रपटांच्या टीमने सामाजिक बांधीलकी जपत मदती हात दिल आहे. 

सध्याच्या परिस्थितीत सतत वाफ घेणं महत्त्वाचं आहे. यातच अनेकांकडे वाफ घेण्यासाठी स्टीमर उपलब्ध नसल्याने या चित्रपटांच्या टीमने स्टीमर वाटप उपक्रम राबवला आहे.  'हरिओम' चित्रपटाचे निर्माते,अभिनेता हरिओम घाडगे आणि त्यांच्या टीमने ही मदत करण्यात आली आहे. कोव्हीड सेंटरसाठी तसेच कोरोनाच्या काळात फ्रंटलाईनवर काम करणारे पत्रकार, आमदार भरतशेठ गोगावले यांनी बिरवाडी एमआयडीसी येथे उभारलेल्या कोविड सेंटर, पितळवाडी येथील सरकारी आरोग्य केंद्र, रायगड पाचाड आरोग्य केंद्र, वरंडोली ग्रामस्थांना स्टीमरचे विनामूल्य वाटप केले. याशिवाय आजूबाजूच्या आदिवासी पाड्यातील गरजुंना अन्नधान्यांचे वाटप केले.  

 या नाविन्यपूर्ण उपक्रमाबरोबरच आपण समाजाचे काही देणे लागतो, या विचारातूनच हरिओम घाडगे यांनी मुंबईच्या सिंह नरवीर तानाजी प्रतिष्ठानच्या माध्यमामधून मोठ्या प्रमाणात समाजसेवेचा वसा हाती घेतला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive