By  
on  

Breaking : अभिनेत्री प्राजक्ता माळीला कोरोनाची लागण, सध्या घरात आहे क्वारंटाईन

मागील वर्षापासून कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलं होतं. आता 2021 मध्येही राज्यासह देशभरात कोरोना विषाणूचा फैलाव वाढला आहे. म्हणूनच महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन ठेवण्यात आलाय. अनेकांना कोरोनाची लागण होत असून अनेकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागलाय.

मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. हिंदीसह अनेक मराठी कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. बरेच कलाकार यातून बरे होऊन कामासाठी परतले आहेत. पिपींगमून मराठीला मिळालेल्या माहितीनुसार 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळीलाही कोरोनाची लागण झाली आहे. 

प्राजक्ताची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून सध्या ती घरातच क्वारंटाईन आहे. प्राजक्ताला कोरोनाचा संसर्ग झाल्याने ती सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत नाहीय. सध्या दमण येथे या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. नुकताय या कार्यक्रमाचा नवा भागही प्रदर्शित करण्यात आला. या नव्या भागांमध्येही प्राजक्ताची अनुपस्थिती पाहायला मिळतेय.

 

प्राजक्ताने नुकतीच सोशल मिडीयावर पोस्टही केली होती. सध्या प्राजक्ता सेटवर असणं मिस करतेय. लवकरच ती या कार्यक्रमाच्या मंचावर परतणार असल्याचं तिने या पोस्टमध्ये म्हटलय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive