सिनेसृष्टीत आई-वडिलांच्या वारसा घेऊन ‘धडक’द्वारे पदार्पण करणारी जान्हवी कपूर सध्या यशाच्या शिखरावर आहे. तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे. प्रेक्षकांची धडकन वाढवण्यात शाहिद कपूरचा भाऊ ईशान खत्तर आणि जान्हवी कपूरला यश आलं. दोघांच्या केमिस्ट्रीने बॉक्स ऑफिसवर जादू केली. समिक्षकांनीसुध्दा या सिनेमाला मनापासून दाद दिली. पहिल्याच आठवड्यात विकेंडला या सिनेमाने जवळपास 30 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. महत्त्वाची बाब म्हणजे आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जान्हवीचे पप्पा म्हणजेच बोनी कपूर लवकरच स्वत:च्याच एका सुपरहिट सिनेमाचा रिमेक करण्याच्या तयारीत आहेत.
चला तर तुम्हाला याबाबत अधिक माहिती देतो, एका आघाडीच्या वृत्तपत्राच्या माहितीनुसार जान्हवी आता वडिलांच्या होम प्रोडक्शनमधून झळकणार असून ‘धडक’पेक्षा तिची या सिनेमातील व्यक्तिरेखा अगदी वेगळी असेल. आगामी सिनेमात ती ग्लॅमरस भूमिकेद्वारे प्रेक्षकांसमोर येईल. बोनी कपूर यांच्या एका जवळच्या व्यक्तीने ही माहिती या वृत्तपत्राला दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, श्रीदेवी आणि अनिल कपूर यांचा सिनेमा ‘मिस्टर इंडिया’सारखा बिग बजेट असणार आहे. तसंच अद्याप या वृत्ताला बोनी कपूर किंवा जान्हवीकडून कुठलाही दुजोरा मिळालेला नाही. जर जान्हवी हाच सिनेमा करणार असेल तर सर्वांनाच तिच्यामध्ये श्रीदेवींची झलक पाहाण्याची संधी मिळेल.
काही दिवसांपूर्वीच जान्हवीने एका मुलाखती दरम्यान म्हटलं होतं की, तिला आई श्रीदेवीच्या ‘सदमा’ सिनेमाच्या रिमेकमध्ये काम करायला आवडेल. आईने साकारलेली भूमिका पुन्हा करायला मिळावी ही तिची इच्छा तिने व्यक्त केली आहे. सर्वांनाच तिच्या या भूमिकेची उत्सुकता असेल.
बोनी कपूर यांनी आतापर्यंत भाऊ अनिल कपूर, पत्नी श्रीदेवी आणि मुलगा अर्जुन कपूर यांच्यासाठी सिनेमे तयार केले आहेत. साहजिकच ते मुलगी जान्हवीसाठी कुठला सिनेमा तयार करत असतील तर त्यात काही नवल नाही. ‘मिस्टर इंडिया’ सिनेमाचा रिमेक करण्याची त्यांची तयारी सुरु असेल तर प्रेक्षकांनासुध्दा ते नक्कीच आवडेल यात मात्र शंका नाही.