By  
on  

पाहा Photos : रुचिता जाधवच्या लग्नसोहळ्याच्या विविध कार्यक्रमांचे खास क्षण

अभिनेत्री रुचिता जाधवच्या लग्नसोहळ्याची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा आहे.  रुचिताने 3 मे रोजी पाचगणी येथे लगीनगाठ बांधली. उद्योगपती आनंद मानेसोबत ती विवाहबंधनात अडकली आहे. यावेळी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला आहे.

या लग्नसोहळ्याचे खास क्षण सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आले आहेत. सेवन मंत्रा फिल्म्सने या जोडप्याचं सुंदर फोटोशुट केलय. रुचितानेही सोशल मिडीयावर या लग्नाचे फोटो शेयर केले आहेत.

 

या फोटोंमध्ये रुचिताचा मराठमोळा साज पाहायला मिळतोय. लाल रंगाची साडी, त्यावर नथ, सोन्याचे दागीने अशा सुंदर लुकमध्ये रुचिरा या फोटोंमध्ये दिसतेय.

 

यात या नवविवाहीत जोडप्याचे फोटो लक्षवेधी ठरत आहेत. या लग्नसोहळ्याच्या विविध कार्यक्रमांची क्षणचित्रे रुचिताने शेयर केली आहेत.

लग्नसोहळ्याच्या विविध कार्यक्रमांचे व्हिडीओही रुचिताने तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर शेयर केले आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive