By  
on  

पुन्हा अज्या-शितली रंगले एकमेकांच्या रंगात, व्हिडियो गाण्यात दिसतीये रोमॅंटिक केमिस्ट्री

‘लागीरं झालं जी’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली जोडी म्हणजे अज्या आणि शितली. या दोघांची तिखट-गोड केमिस्ट्री अख्या महाराष्ट्राला आवडली. शितलीचा खोडकर स्वभाव, फटकळ बोलणं तर अज्याचा राग, शितलीच्या खोड्या काढण्याचा स्वभाव अनेकांना आवडला. मालिकेत सध्या ही जोडी आई-बाबा होणार असली तरी व्हिडियो पॅलेसच्या नव्या गाण्यात त्यांची लव्हस्टोरी पुन्हा एकदा रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. नितीश चव्हाण आणि शिवानी बावकर यांच्यातील रोमॅंटिक केमिस्ट्री ‘खुळाच झालो गं’ या गाण्यातून रसिकांना अनुभवण्यास मिळणार आहे. या गाण्यात अज्याचं नाव मल्हार तर शितलीचं नाव उर्वी असणार आहे. कॉलेजमध्ये खुलत जाणारे ही लव्हस्टोरी रसिकांना आवडेल यात शंका नाही.

https://www.youtube.com/watch?v=A_EJi-tgAJo&feature=youtu.be

Recommended

PeepingMoon Exclusive