By  
on  

या अभिनेत्याला खलनायक म्हणून घेऊन मसालेदार चित्रपट बनवण्याची दिग्दर्शक विजू माने यांची इच्छा

प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांनी अनेक चित्रपट बनवले आहेत. त्यांच्या कलाकृती या लोकप्रिय आहेत. मात्र दिग्दर्शक म्हणून आपल्या चित्रपटात अमूक कलाकाराने आवर्जून काम करावं अशी काही दिग्दर्शकांची इच्छा असते. अशीच विजू माने यांची एक इच्छा कायम असते. त्यांच्या सिनेमात ते कायम एका अभिनेत्यासाठी हट्ट धरतात. तो अभिनेता म्हणजे संदीप जुवाटकर.

संदीपने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही विविध भूमिका साकारल्या आहेत. 'तान्हाजी' या चित्रपटातील त्याची भूमिका लक्षवेधी ठरली होती. त्याच्या वाढदिवसानिमित्ता दिग्दर्शक विजू माने यांनी खास पोस्ट केली आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा देत विजू माने यांनी त्यांची एक इच्छा व्यक्त केली आहे. 

ते या पोस्टमध्ये लिहीतात की, "बड्डे माझ्या वाघाचा... संदीप जुवाटकर. माझ्या सिनेमात मी कायम एका अभिनेत्याचा हट्ट धरतो. सॅन्डि.तोसुध्दा छोटा रोल मोठा रोल न पाहता काम करतो. ह्याला मुख्य व्हिलन म्हणून घेऊन एक मसालेदार सिनेमा करण्याचा माझा मानस आहे... दिसायला रांगडा असला तरी मनानं निरागस आहे. अर्थात क्रिकेटच्या मैदानावर बॅटींग करताना मात्र “कणखर बाणा आणि जोरदार हाणा” असतं. धुंवाधार फलंदाजी करतो. सगळ्यांच्या लाडका सॅन्डीला वाढदिवसाच्या धिप्पाड शुभेच्छा."

 

पिळदार शरीरयष्ठीमुळे संदीप कायम सगळ्यांचं लक्ष वेधतो. मात्र तो एक उत्तम माणूस असल्याचं विजू माने यांच्या पोस्टमधून पाहायला मिळतय. अभिनयासोबतच संदीपला फिटनेस आणि क्रिकेटची प्रचंड आवड आहे. त्यामुळे अभिनयक्षेत्रात काम करत असताना अनेक सेलिब्रिटी क्रिकेट सामन्यांमध्येही त्याचा सहभाग असतो.  वाढदिवसानिमित्ताने संदीपला विजू माने यांच्याकडून इच्छारुपी ही खास भेट मिळालीय असही म्हणता येईल. तेव्हा विजू माने यांच्या एखाद्या आगामी मसालेदार चित्रपटात संदीप खलनायकाची भूमिका साकारेल यात शंका नाही. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive