By  
on  

महेश कोठारे आणि कुटुंबाला असा करावा लागला होता संघर्ष, कोठारे कुटुंबावर होता कर्जाचा डोंगर

प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्यात संघर्ष आणि चढ-उतार हे येत असतातच. मात्र त्यातून मिळणारं यश हे महत्त्वाचं असतं. दिग्दर्शक, अभिनेते महेश कोठार आणि त्यांच्या परिवारालाही अशा संगर्षातून जावं लागलं आहे. अभिनेता आदिनाथ कोठारेने नुकत्याच एका प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्यांच्या संघर्षाच्या काळाविषयी सांगीतलं. 

मराठी, हिंदी चित्रपट, मालिका विश्वातील दिग्दर्शन, निर्मिती क्षेत्रातील मोठं नाव म्हणजे महेश कोठारे. त्यांचा मुलगा आदिनाथ कोठारेदेखील याच क्षेत्रात एक यशस्वी अभिनेता, दिग्दर्शक म्हणून काम करतोय. मात्र हेच कोठारे कुटुंब एकेकाळी कर्जाच्या ओझ्याखाली होतं. कर्जामुळे त्यांना अनेक तडजोडी कराव्या लागल्या होत्या. त्यावेळी ते जुनी सेकंड हँड कार वापरत असल्याचं आदिनाथने सांगीतलं. याविषयी सांगताना त्याने एका प्रसिद्ध पुरस्कार सोहळ्याची आठवण सांगीतली.

या पुरस्कार सोहळ्यात कोठारे कुटुंब जुनी सेकंड हँड कार घेऊन गेले होते. एकीकडे हिंदी कलाकारांच्या चकचकीत महागड्या गाड्या होत्या तर दुसरीकडे त्यांच्याकडे जुनी गाडी. याचं आदिनाथला वाईट वाटत होतं. त्याला या गोष्टीचं वाईट वाटत होतं. त्यावेळी आदिनाथ नवतरुण होता. हा प्रसंग त्याला आठवून संघर्षाचा काळ आठवतो.

या प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आदिनाथ सांगतो की, "प्रत्येक कलाकारांच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. आमच्या कुटुंबाच्या जीवनातही आले. माझ्या वडिलांनी यशाचं शिखर गाठलं होतं. लागोपाठ सहा-सात सुपरहीट चित्रपट केले होते. मी तेव्हा खूप लहान होतो. मी दहावीत असताना त्यांनी एका हिंदी चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यावेळी त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. त्या डोंगराखाली आम्ही पुढची दहा वर्षे काढली. पण त्या डोंगराच्या सावलीतही एका वादळाला झुंज देणाऱ्या पर्वतासारखे उभे राहणारे माझे आई-वडील मी कधीच विसरु शकत नाही."

Author

Recommended

PeepingMoon Exclusive