By  
on  

पाहा Video : या चित्रपटाने बदललं नृत्यदिग्दर्शिका फुलवाचं आयुष्य, सादर केली 'अप्सरा आली..' लावणी

फुलवा खामकर ही मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शकांपैकी एक लोकप्रिय कलाकार आहे. तिने दिग्दर्शित केलेली अनेक गाणी लोकप्रिय ठरली, एवढच नाही तर त्या गाण्यांमधील स्टेप्सही लोकप्रिय ठरल्या. याच फुलवा खामकरचा मराठी मनोरंजन विश्वातील प्रवास सुरु झाला तो 2010 साली. रवी जाधव दिग्दर्शित 'नटरंग' या चित्रपटाच्या निमित्ताने फुलवाने मराठी इंडस्ट्रीत नृत्यदिग्दर्शिका म्हणून सुरुवात केली होती. 

याच चित्रपटाची आणि चित्रपटाच्या गाण्यांची आठवण म्हणून फुलवाने एक खास व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. या व्हिडीओत फुलवाने अप्सरा आली या लोकप्रिय गाण्यावर नृत्य सादर केलय. 'नटरंग' चित्रपटातील या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन फुलवानेच केलं होतं. या गाण्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या अदा आणि नृत्याने शोभा वाढवली होती. याच गाण्यावर पुन्हा वेगळ्या अंदाजात फुलवाने लावणी सादर केली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by PHULAWA (@phulawa)

 

त्यासाठी फुलवाने नथ घालून, नऊवारी परिधान करून नृत्य सादर केलं. नृत्याची जाण असलेल्या अनेकांनी या व्हिडीओला पसंती दिली आहे. या व्हिडीओसह फुलवा या पोस्टमध्ये लिहीते की, "अप्सरा आली. नटरंग चित्रपटातील माझी सगळ्यात आवडती लावणी. 2010 या वर्षी याच चित्रपटातून मी मराठी इंडस्ट्रीत नृत्यदिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं. हा माझा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाशी जोडलेल्या सगळ्यांचच आयुष्य या चित्रपटाने बदललं. मला आशा आहे की तुम्हाला अप्सरा आली गाण्यावर केलेलं हे नृत्य आवडेल."
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive