अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड एका नव्या भूमिकेसह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाई साकारली होती. या भूमिकेतून तिने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. या मालिकेतून प्राजक्ताला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
आता लवकरच प्राजक्ता एका चित्रपटातून झळकणार आहे. 'लॉकडाऊन लग्न' असं या चित्रपटाचं नाव आहे. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला आहे. प्राजक्ताने यावषियी सोशल मिडीयावरही पोस्ट शेयर केली आहे. तिच्या या नव्या वाटचालीला सुरुवात झाली असून या मुहूर्ताचे फोटो तिने शेयर केले आहेत. या पोस्टमध्ये ती लिहीते की, "गणपती बाप्पा मोरया.. 14 मे,आज अक्षय तृतीया, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त....छत्रपती संभाजी महाराज जयंती... याच शुभमुहूर्तावर माझ्या नव्या प्रोजेक्टची सुरुवात...."
या चित्रपटाचं पहिलं पोस्टरही समोर आलय. या पोस्टरमध्ये लग्नपत्रिका 'आपला आहेर हाच आर्शिवाद' असही लिहीलय. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात लॉकडाऊन लग्न हे नाव लक्षवेधी ठरतय. सध्या कोरोना काळात लग्नसोहळ्यावरील विविध बंधने पाहता हा विषय रंजक असेल यात शंका नाही.
आई माझी काळूबाई या मालिकेत प्राजक्या मुख्य भूमिकेत झळकली होती. मात्र निर्माते आणि कलाकारांसोबतच्या वादामुळे या मालिकेतून तिला बाहेर पडावं लागलं. हे सगळं प्रकरण बरच चर्चेत आलं होतं. मात्र प्राजक्ता पुन्हा तिच्या कामाला लागल्याचं चित्र आता पाहायला मिळतय.