अभिनेता संदीप पाठकने वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदर्शित केले 'राख' या आगामी सिनेमाचे पोस्टर

By  
on  

अभिनेता संदीप पाठकवर आज वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक नाटक, चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका आणि अभिनय कौशल्यातून संदीपने असंख्य प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याच चाहत्यांसाठी संदीप पाठकने आज रिटर्न गिफ्ट दिलय. त्याने आगामी सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित केलं आहे. 

राख असं संदीप पाठकच्या या आगामी सिनेमाचं नाव आहे. या पोस्टरमध्ये संदीप रेल्वेच्या रुळावर डोक ठेवताना दिसतोय. या पोस्टरने सगळ्यांचच लक्ष वेधलं आहे. राजेश चव्हाण यांची ही एक सायलेंट फिल्म आहे. पोस्टर प्रदर्शित करून संदीपने या पोस्टमध्ये लिहीलय की, " आज १४ मे,अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आणि माझ्या वाढदिवसाच्या निमीत्ताने मी माझ्या "राख" या नवीन सिनेमाचे पोस्टर तुमच्या समोर घेऊन येतोय. पोस्टर कसे वाटले ते नक्की सांगा. आभार"

 

या पोस्टरवरुन सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. या सिनेमाविषयी आणखी माहिती लवकरच समोर येईल. मात्र वाढदिवसाच्या शुभेच्छांसह संदीपला या नव्या सिनेमाच्या पोस्टरसाठीही प्रतिक्रिया आणि सिनेमासाठी शुभेच्छा मिळत आहेत.

Recommended

Loading...
Share