पाहा Photos : रिंकू राजगुरुच्या साडीतील या फोटोंनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

By  
on  

सैराटमधील आर्ची म्हणून ओळख असलेली अभिनेत्री रिंकू राजगुरुचा आता मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. सोशल मिडीयावर तर रिंकूचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. रिंकूही सोशल मिडीयावर तशी बऱ्यापैकी सक्रिय असते. विविध लुकमधील रिंकूचे फोटो सोशल मिडीयावर कायम चर्चेत असतात.

नुकतेच रिंकूने तिचे काही खास फोटो शेयर केले आहेत. रिंकूचं साडी प्रेम हे तिच्या सोशल मिडीया अकाउंटवरुन पाहायला मिळत. त्यात रिंकूचे साडी नेसलेले फोटोच जास्त प्रमाणात आढळतील. नुकत्याच केलेल्या पोस्टमध्येही रिंकूने साडी नेसली आहे.

काळ्या रंगाची साडी आणि लाल ब्लाउज असं हटेक कॉम्बिनेश रिंकूने या लुकमध्ये केलय. या फोटोंना मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली असून हजारो लाईक्स मिळाले आहेत. 

लवकरच रिंकू ही 'आठवा रंग प्रेमाचा' आणि 'छूमंतर' या दोन सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Recommended

Loading...
Share