पाहा Photos : खूप दिवसांनी तयार होऊन अभिनेत्री तेजस्विनी पंडितने काढले हे सुंदर फोटो

By  
on  

सध्याच्या कोरोना काळात कायम नकारात्मकता पसरवणारा सोशल मिडीया थोड्या प्रमाणात सकारात्मक असल्याचं जाणवतोय. लोक एकमेकांना मदत करण्यासाठी सोशल मिडीयावर सक्रिय झाले आहेत. यात मनोरंजन विश्वातील कलाकारांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडितही कोरोना काळात रुग्णांपर्यंत मदत पोहोचावी यासाठी सोशल मिडीयाच्या सहाय्याने मदत करतेय. 

त्यामुळे तेजस्विनी सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली आहे. याशिवया सकारात्मकता पसरवण्याचाही प्रयत्न करतेय. तेजस्विनीने नुकतेच काही खास फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. या फोटोत तेजस्विनीचं निखळ हास्य पाहायला मिळतय.

ती या पोस्टमध्ये लिहीते की, "खूप दिवसांनी तैयार झाले कुठेच न जाण्यासाठी म्हणून मग......फोटो काढले "

 

कोरोनामुळे राज्यात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे घराबाहेर न पडता घरात राहुनच तेजस्विनी ही फोटो क्लिक केले आहेत. तेजस्विनीचे हे फोटो पाहून इतरांना सकारात्मक ऊर्जा मिळाली असेल एवढं नक्की. 

Recommended

Loading...
Share