By  
on  

पाहा Photos : अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या पत्नीच्या या फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

सोशल मिडीयावर विविध ट्रेंड पाहायला मिळतात. यातच सोशल मिडीयावर पोस्ट करण्यात येणाऱ्या फोटोंसाठी विविध फोटोशुटचे प्रयोग करण्यात येतात. मग यात हटके पेहराव, पोझ आल्याच. अभिनेत्री मिताली मयेकरने असाच एक ट्रेंड फोटो केलेला पाहायला मिळतोय. इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेक अभिनेत्री, मॉडेल्सचे पांढऱ्या शर्टातील फोटोशुट पाहायला मिळतं. या ट्रेंडमध्ये आता मितालीही सहभागी झालेली पाहायला मिळतेय. 

मितालीने नुकतेच तिचे काही खास फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. 

या फोटोंमध्ये मितालीने पांढऱ्या रंगाच्या शर्टाची स्टाईल केली आहे. मितालीचा सुंदर लुक यात पाहायला मिळतोय. सोशल मिडीयावर या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले आहेत. 

मिताली ही विविध मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकलीय. बालकलाकार म्हणून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. याचवर्षी म्हणजेच 2021 मध्ये अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मितालीने लगीनगाठ बांधली आहे. याचवर्षी मिताली मिसेस चांदेकर झाली आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive