By  
on  

काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनाने रितेश देशमुख भावुक

काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अखेर संपली. कोरोनामुळे त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातून दु:ख व्यक्त केलं जातय. मनोरंजन विश्वातील कलाकारांनीही सोशल मिडीयावर दु:ख व्यक्त केलं आहे. 

 

अभिनेता रितेश देशमुखनेही ट्विट करून राजीव यांच्या निधनाचं दु:ख व्यक्त केलं आहे. रितेशने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तो लिहीतो की, "राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त हे अतिशय धक्कादायक आहे. या घटनेनं मला अतिशय दु:ख झालं असून ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. सातव यांचं नेतृत्त्व तरुण आणि स्फोटक होतं. मोठं राजकीय करियर त्यांच्यासमोर उभं होत. माझ्याकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्यासाठी ताकद मिळू देत."

 राजकीय वर्तुळातील अनेकांना सोशल मिडीयावर सातव यांना  श्रद्धांजली वाहिली आहे. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive