By  
on  

पाहा Video : स्वप्निल आणि मुक्ताचं मनमोकळं हास्य, मुक्ताच्या वाढदिवसाला स्वप्निलने शेयर केली ही खास आठवण

'मुंबई-पुणे-मुंबई', 'मुंबई-पुणे-मुंबई 2', 'मुंबई-पुणे-मुंबई 3', 'मंगलाष्टक वन्स मोअर' या चित्रपटांमधून झळकलेली अभिनेता स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री मुक्त बर्वे ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. त्यांचा रोमान्स, केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली. 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या मालिकेतूनही त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. 'मुंबई-पुणे-मुंबई' चित्रपटाच्या सिरीजमधून तर त्यांची कमाल केमिस्ट्री पाहायाला मिळाली. त्यांची गाणी, संवादही चर्चेत आले. स्वप्निल - मुक्ता हे जणू मराठीतील शाहरुख - काजोल अशी ही त्यांना ओळख मिळाली. पण जशी त्यांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री तशीच ऑफस्क्रिनही ही जोडी कमाल आहे. कारण स्वप्निल आणि मुक्ता यांची ऑफस्क्रिन घट्ट मैत्री आहे. याची प्रचीती पुन्हा आलेली नुकत्याच सोशल मिडीयावर शेयर केलेल्या एका व्हिडीओतून

आज मुक्ता बर्वेच्या वाढदिवासानिमित्ताने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यात मग स्वप्निल जोशीकडून तिला खास शुभेच्छा मिळणारच. स्वप्निलने मुक्ताला शुभेच्छा देण्यासाठी एक खास व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केलाय. या व्हिडीओत दोघांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळतेय. दोघं एकामेकांकडे पाहुन मनमोकळं हसताना दिसताय. चाहत्यांनाही ही आवडती जोडी या व्हिडीओच्या माध्यमातून पुन्हा एकत्र पाहुन प्रचंड आनंद झालाय.

 

स्वप्निल या पोस्टमध्ये लिहीतो की, "खूप कमी माणसं असतात ज्यांच्या बरोबर तुम्ही इतकं निरर्थक पण मनमोकळ हसू शकता ! मी नशीबवान आहे की आपण एका मार्गावर भेटलो. वाढदिवसाच्या शुभेच्छा खिकी."

स्वप्निलने मुक्ताला खिकी हे टोपण नाव दिलय. याचा उल्लेख त्याने या पोस्टमध्येही केलाय. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive