प्रसिद्ध मराठी लेखक, दिग्दर्शक, गीतकार प्रणित कुलकर्णी यांचं निधन झालं. सोमवारी पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या वृत्ताने मराठी सिनसृष्टीत शोककळा पसरली आहे. प्रणित यांच्या अशा अचानक जाण्यानं मराठी सिनेविश्वातील कलाकारांना प्रचंड दु:ख झालय. अनेकांनी सोशल मिडीयावर हे दु:ख व्यक्त करत प्रणित यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
प्रणित यांनी 'देऊळ बंद' या चित्रपटासाठी दिग्दर्शन केलय. 'मुळशी पॅटर्न' चित्रपटातील 'आरारारा खतरनाक' हे लोकप्रिय प्रसिद्ध गाणही त्यांनीच लिहीलय. या गाण्याला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. यासह अनेक मालिकांसाठीही त्यांनी गाणी लिहिली आहेत. 'शिवबा ते शिवराय' या दृकश्राव्य कार्यक्रमाचे ते लेखक, गीतकार, दिग्दर्शक होते. 'जीवन यांना कळले हो' या कार्यक्रमाचेही ते लेखक -दिग्दर्शक होते. 'सुरक्षित अंतर ठेवा' या नाटकाचे त्यांनी लेखन - दिग्दर्शन केले होते. 'ऑल द बेस्ट' या मालिकेसाठीही त्यांनी लेखन-दिग्दर्शन केले आहे. वेडींगचा शिनेमा या चित्रपटात त्यांनी भूमिकाही साकारली होती.
प्रणित यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहुन अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे.
Pranit kulkarni दादा...
भावपूर्ण श्रद्धांजली pic.twitter.com/1fXwpipseb— SIDDHARTH JADHAV (@SIDDHARTH23OCT) May 17, 2021