'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून शनाया या भूमिकेतून अभिनेत्री रसिका सुनील लोकप्रिय ठरली. सोशल मिडीयावरही रसिकाचा मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी रसिका सोशल मिडीयावर विविध पोस्ट करताना दिसते. नुकतच रसिकाने केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे.
रसिकाने नुकताच एक फोटो शेयर केला आहे. या फोटोचं कॅप्शन मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतय. या कॅप्शनमध्ये रसिका लिहीते की, "माझ्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट किस. काही हरकत नाही. आदी मी तुझ्यावर जास्त प्रेम करत ओके ?"
रसिकाने लिहीलेलं हे कॅप्शन सध्या लक्ष वेधतय. रसिकाने नुकतच नवा पेट घरी आणलाय. याच पेटसोबत तिने एक गोंडस फोटो शेयर केला आहे. या फोटोच्या खाली तिने कॅप्शन लिहून बॉयफ्रेंड आदित्यला सांगीतलंय की मी तुझ्यावर जास्त प्रेम करते.
रसिकाने नुकतच घरी एक गोंडस पेट (कुत्रा) घरी आणलाय. त्याच नाव रश असं ठेवण्यात आलय. रसिकाने या नव्या पाहुण्याचा व्हिडीओही शेयर केलाय. या पोस्टमध्ये ती लिहीते की, "तर तो इथे आहे. आजचा दिवस खास होता कारण तो आमच्या आयुष्यात आलाय. त्याचं नाव रश आहे."