पुस्तक वाचल्याने ज्ञानात भर पडते, पुस्तक हे आपले मित्र असतात, पुस्तक वाचण्याचे हे आणि इतर बरचे फायदे आहेत. त्यामुळे वाचाल तर वाचाल असही म्हटलं गेलय. अनेकांना सध्याच्या लॉकडाऊनमुळे ही आवड सवय पुन्हा झाली आहे. अभिनेता भूषण प्रधाननेही वाचलाना सुरुवात केली आहे. भूषणने पुस्तक वाचन सुरु केल्याचं तो पोस्टमधून सांगतोय.
भूषणने पुस्तक वाचतानाचा फोटो नुकताच शेयर केलाय. आता नियमित पुस्तक वाचण्याची सवय त्याच्यासह त्याच्या आईलाही लागली आहे. त्यामुळे काही दिवसातच भूषणने 5 ते 6 पुस्तके वाचली आहेत.
तो लिहीतो की, "अखेर नियमित वाचनाची सवय लागली! गेल्या काही आठवड्यांत आईने आणि मी मिळून जवळपास ५-६ पुस्तके वाचली. आणि आता ही रोजची सवय झाली आहे. सवय आणि आवडही! जे. के रोलिंग यांनी अगदी बरोबर म्हटले आहे “तुम्हाला वाचनाची आवड नसेल तर तुम्हाला अजून योग्य पुस्तक सापडले नाही.या सवयीबद्दल आणि आम्ही वाचलेल्या पुस्तकांबद्दल बरेच काही सांगायचे आहे... लवकरच!"
तेव्हा या वाचलेल्या पुस्तकांबद्दल भूषण लवकरच काहीतर सांगणार असल्याचं म्हणतोय. या फोटोत भूषण हा अभिनेत्री अमृता सुभाषचं 'एक उलट एक सुलट' हे पुस्तक वाचतोय.