By  
on  

सोनी मराठीच्या मायलेकींचा असा साजरा झाला मोहक 'मदर्स डे'

आंतरराष्ट्रीय मातृदिन किंवा मदर्स डे म्हणजे आई आणि मुलांमधल्या प्रेमाचा उत्सव! आई आणि मुलांमधले मायेचे नाते निरंतर असले तरीही आपल्या मायेच्या भावना व्यक्त करण्याचा 'हा दिवस तसा स्पेशलच. तरुणाई या निमित्ताने आईशी कनेक्ट होत हा सण साजरा करत असताना सेलिब्रिटीही यामध्ये मागे कसे असणार! मराठी मनोरंजन जगतामध्ये सोनी मराठी चॅनल करमणुकी सोबतच इतरही नवनवे उपक्रम घेऊन असते. अर्थातच सोनी मराठीच्या 'सेलिब्रिटी मॉम्स'नी अगदी हटके स्टाईल मदर्स डे साजरा केला आहे.

मदर्स डे निमित्त सोनी मराठीने ऋचा बर्वेसीमा घोगलेगौतमी देशपांडेमुग्धा गोडबोलेशीतल क्षीरसागरआदिती शारंगधरउज्वला जोगपूर्णिमा अहिरेविमल म्हात्रेप्रज्ञा जावळेराणी गुणाजीरसिका धामणकर आणि मयुरी वाघ या सर्व आया आणि लेकींनी मुंबईतील 'एनरिच अकॅडमीया स्पामध्ये ट्रिटमेंटचे खास गिफ्ट दिले. या निमित्ताने सोनी मराठीच्या वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री तर एकत्र आल्याचपण त्यांच्याबरोबर त्यांच्या लेकिंचाही सहभाग पहिल्यांदाच झाला. 

शरीर प्रसन्न असेल तर मन प्रसन्न राहते. आणि शिवाय ह्या दिवशी आईची 'स्पेशलबडदास्त आणि लाड करायचे असल्यामुळे आया आणि लेकी दोघींनीही सौंदर्याची सुखावह निगा आणि काळजी घेणाऱ्या खास *ट्रिटमेंट्स घेऊन रिलॅक्स केले. कुणी नवा हेअरकट केलातर कोणी हेअरवॉश केलेतर कुणी नखांवर सुंदरशी नेल आर्ट काढली. लेकिंनीही आपल्या मम्मासारखे ग्लॅमरस होऊन मिरवले. आपल्या लेकीबरोबर चांगला वेळ घालवण्याची आणि एक मैत्रीण म्हणून कनेक्ट होण्याची ही संधी आयांनी पुरेपूर वापरली. कलाविश्वातील या सर्व सखींचा आणि त्यांच्या लेकींचा हा आगळावेगळा सुंदर मिलाफ घडवून आणल्याबद्दल सेलिब्रिटी मॉम्सनी सोनी मराठीचे विशेष आभार मानले आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive