By  
on  

पाहा Video : 'दगडू' थिरकला अनील कपूर यांच्या गाण्यावर, केली ही प्रसिद्ध स्टेप

सध्या कोरोनाग्रस्त काळात भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. अशात सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक जण सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध फोटो आणि व्हिडीओ शेयर करून सध्याच्या परिस्थितीवर मात करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न अनेक जण करत आहेत. अभिनेता प्रथमेश परबनेही इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणेल अशीच एक पोस्ट केली आहे. 

'टाईमपास' चित्रपटातील दगडू म्हणून लोकप्रिय ठरलेल्या प्रथमेशने एक डान्स व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. फिल्मी फ्रायडे म्हणत त्याने बॉलीवडु गाण्यावर धमाल डान्स केला आहे.

 

 अभिनेते अनील कपूर यांचं 'राम लखन' चित्रपटातील 'माय नेम इज लख'न हे गाणं आहे. या गाण्यातील अनील कपूर यांची प्रसिद्ध स्टेप करत प्रथमेश या गाण्यावर थिरकला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पसंती दिली असून लाईक्सचाही वर्षाव केलाय.

विविध चित्रपट आणि नाटकांमधून प्रथमेशने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. टकाटक नंतर आता लवकरच 'टकाटक 2' चित्रपटातून प्रथमेश झळकणार आहे. याशिवाय 'लव सुलभ' या सिनेमातूनही तो भेटीला येईल. 'टाईपास'च्या दुसऱ्या भागानंतर आता रवी जाधव तिसरा भागही घेऊन येत आहेत. तेव्हा तिसऱ्या भागातही प्रथमेशचा दगडू भूमिकेतील अंदाज पाहायला मिळेल एवढं नक्की.

Recommended

PeepingMoon Exclusive