By  
on  

सुमित्रा भावेंनी दिग्दर्शित केलेला अखेरचा सिनेमा दिठीवर होतोय कौतुकाचा वर्षाव

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या प्रतिभासंपन्न लेखिका- दिग्दर्शिका यांचा अखेरचा सिनेमा दिठीवर रसिक प्रेक्षकांसह समिक्षकांकडूनही कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय. अलिकडेच हा सिनेमा सोनी लिव्ह एप या डिजीटल माध्यमातून प्रदर्शित झाला.

सुमित्रा भावे यांचे सर्वच सिनेमे हे दर्जेदार आणि रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे आहेत . दिठीसुध्दा त्याला अपवाद नाहीत.  गिरीश कुलकर्णी, किशोर कदम, अमृता सुभाष, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर अशा सक्षम कलाकारांचा तितकाच सक्षम अभिनय पाहण्याची पर्वणी रसिक प्रेक्षकांना या सिनेमाच्या निमित्ताने मिळतेय. 

दि. बा मोकाशी यांच्या कथेवर आधारित असलेला हा सिनेमा आपल्या आंतरमनाचा ठाव घेतो. ऐन तारुण्यात मृत्यू पावलेल्या एका तरुण मुलाच्या बापाची ही कथा आहे. जन्म-मृत्यू, सुख-दु:ख या भावनांपलिकडे आपल्याला विचार करायला हा सिनेमा भाग पाडतो. 

 

 

 

सुमित्रा भावे ह्यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत ६ आंतरराष्ट्रीय पुरस्कार, ११ राष्ट्रीय पुरस्कार आणि ४५ हून अधिक राज्य पुरस्कार मिळाले होते. कथा, पटकथा, गीत लेखन, कला दिग्दर्शन, वेशभूषा आणि दिग्दर्शिका म्हणून त्यांनी अनेक वैयक्तिक पुरस्कारही जिंकले होते. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive