By  
on  

पाहा Video : अभिनेता उमेश कामतला या गोष्टीची येत आहे आठवण

सध्या कोरोना विषाणूने देशभरात थैमान घातलय. कोरोना काळात राज्यात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनमुळे अनेक गोष्टींवर बंधन आणली गेली आहेत. यात मनोरंजन विश्वाचही काम बंद झालय. महाराष्ट्रात चित्रीकरण बंद, सिनेमागृह, नाट्यगृह बंद असल्याने मनोरंजन विश्वातील कलाकारांना विविध अडचणींना सामोरं जावं लागतय. काही मालिकांचे चित्रीकरण हे महाराष्ट्राबाहेर सुरु आहे. मात्र सिनेमा, नाटक क्षेत्र ठप्प झालय. या सगळ्यात काही कलाकार, तंत्रज्ञ यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. आर्थिक चणचणही भासतेय. 

या सगळ्यात नाटकात काम करणारे कलाकारांना रंगभूमीची आठवण येत आहे. अभिनेता उमेश कामतने अशीच एक पोस्ट शेयर केली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे नाट्यगृह, नाटकाचे प्रयोग बंद आहेत. म्हणूनच उमेशला नाटकांची प्रचंड आठवण येत आहे. त्याने नुकताच एक व्हिडीओ शेयर केलाय. या व्हिडीओत नाटक, रंगभूमी, नाट्यरसीक, हाऊसफुलचा बोर्ड, तालीम या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. या व्हिडीओतून त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

 

उमेशसह अनेक कलाकार त्यांचं काम मिस करत आहेत. लवकरच लॉकडाऊन संपल्यानंतर, कोरोनाची फैलाव कमी झाल्यावर पुन्हा जोमाने कामाला सुरुवात होण्याच्या आशेत अनेक जण पुन्हा सगळं पूर्ववत होण्याची वाट पाहत आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive