कला ही कुणाची वैयक्तिक मालमत्ता नाही. कलेवर प्रत्येकाचाच समान अधिकार आहे. कला कोणत्याही व्यक्तीच्या सामाजिक, वैयक्तिक शारिरीक, आर्थिक स्तराच्या पलीकडे असते. त्यामुळे समाजातील प्रत्येक स्तराला तिचा आनंद घेण्याचा अधिकार आहे. नेमकं हेच हेरून जेष्ठ नाटककार, रत्नाकर मतकरी यांनी ‘वंचितांचा रंगमंच’ हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाखाली मुलांना ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाचा आनंद घेण्याची संधी मिळाली. या नाटकातील कलाकारांनीही मुलांसोबत धमाल करण्याची संधी सोडली नाही. वैभव मांगले या नाटकात चिंची चेटकिणीच्या भूमिकेत आहे. गडकरी रंगायतन,ठाणे इथे हा प्रयोग पार पडला.
https://twitter.com/AlbatyaGalbatya/status/1126438684914401280