लग्नाचा वाढदिवस म्हणजे संसाराचा सुख-दु:खाचा एकत्र केलेल्या प्रवासाची आठवण. हा दिवस अभिनेता सुनील बर्वे यांच्यासाठी देखील खास आहे. म्हणूनच लग्नाच्या वाढदिवसा निमित्ताने सुनील बर्वे आणि पत्नी अपर्ण बर्वे यांनी खास व्हिडीओ शेयर केलाय. या व्हिडीओत पत्नीसोबतच्या जुन्या आठवणींचा साठा पाहायला मिळतोय.
अभिनेते सुनील बर्वे आणि अपर्णा बर्वे यांच्या एकत्र प्रवासाला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने या व्हिडीओत त्यांच्या आयुष्यातील खास 30 क्षणांचा समावेश करण्यात आलाय. यात जुन्या आठवणी, लग्नाचे फोटो आणि काही खास क्षण पाहायला मिळत आहेत.
सुनील बर्वे आणि अपर्णा यांनी सोशल मिडीयावर त्यांचे हे खास क्षण सगळ्यांसोबत शेयर केले आहेत. लग्नाच्या वाढदिवसाचं हे खास गिफ्ट त्यांनी एकमेकांना दिलय असंही म्हणता येईल. या व्हिडीओतील विविध फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधलय. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनीही या पोस्टवर कमेंट करून त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.