By  
on  

म्हणून 'पवित्र रिश्ता'च्या दुस-या सीझनमध्ये दिसणार नाहीत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी

‘पवित्र रिश्ता’ ही छोट्या पडद्यावरची सर्वात गाजलेली हिंदी मालिका. सर्वसामान्य मराठी कुटुंबातील घडामोडी दर्शवणा-या या मालिकेने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. महत्त्वाचं म्हणजे दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत या मालिकेमुळे घराघरांत पोहचला. सुशांतच्या निधनानंतर आता ब-याच वर्षांनी या मालिकेचा सिक्वल यावा अशी चाहत्यांची इच्छा होती. म्हणूनच निर्मात्यांनी ही इच्छा पूर्ण करण्याचं ठरवत ‘पवित्र रिश्ता 2.0’  हा या मालिकेचा सिक्वल भेटीला आणण्याचं ठरवलंय.

हिंदी कलाकारांसोबतच सविता प्रभुणे, किशोर महाबोले, उषा नाडकर्णी,  प्रार्थना बेहरे, प्रिया मराठे आदी मराठी कलाकारांची या मालिकेत मांदियाळी पाहायला मिळाली. जशी मालिका लोकप्रियता मिळाल्यानंतर पुढे गेली तसे मालिकेतील अनेक कलाकार बदलले. पण ही मराठी कलाकारांची फळी त्यांच्या सर्वोत्तम भूमिकांमुळे नेहमीच लक्षात राहिली. झी टीव्हीवरीरल ही मालिका 2009 सालापासून ते 2014 पर्यंत अखंड सुरु होती. 

‘पवित्र रिश्ता’ मालिकेमुळे मानव आणि अर्चनाची निरागस प्रेमकहाणी अजरामर झाली. या प्रेमकहाणीत अर्चना सासुरवास करणा-या आपल्या उषा नाडकर्णी खाष्ट सासू म्हणून चांगल्याच लक्षात राहिल्या. तसंही मराठी सिनेविश्वात  सासूबाई म्हणून उषाताईंनी आपली छाप सोडलीय. 
 अर्चनाची भूमिका साकारणारी अंकिता लोखंडे या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण सुशांतची कमतरता नेहमीच भासेल. पण मानवची आई म्हणजेच ही भूमिका साकारणा-या ज्येष्ठ अभिनेत्री  उषा नाडकर्णी मात्र या मालिकेचा भाग नसतील असं स्पष्ट झालं आहे. 

वयाची 77 री ओलांडलेल्या उषाताईंना प्रकृतीच्या कारणास्तव डेलीसोपचं पॅक्ड शेड्यूल सांभाळणं जमणार नाही. तसंच प्रकृतीच्या इतर कारणास्तव त्या या मालिकेच्या दुस-या सीझनचा भाग नसतील. याशिवाय घरातील मंडळींकडूनसुध्दा त्यांना शूटींग करण्यास मनाई करण्यात आलीय. त्यामुले खाष्ट सासू म्हणून त्या या मालिकेत नसतील, पण त्यांचा दबदबा आणि करारी बाणा प्रेक्षक मिस करतील. 

उषाताईंचा या वयातला उत्साहदेखील वाखाणण्याजोगा असतो. यापूर्वी त्या मोलकरीण बाई या कार्यक्रमात  आणि मराठी बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्ये झळकल्या होत्या.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive