By  
on  

'रंग माझा वेगळा' मालिकेत कार्तिक साकारणाऱ्या आशुतोष विषयी ही गोष्टी माहिती आहे का ?

रंग माझा वेगळा ही मालिका कमी कालावधीतच लोकप्रिय ठरली. या मालिकेचा वेगळा विषय प्रेक्षकांना भावला. या मालिकेतील प्रत्येक पात्रही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं. यापैकीच एक व्यक्तिरेखा म्हणजे डॉक्टर कार्तिक इनामदारची. अभिनेता आशुतोष गोखले ही भूमिका साकारतोय. आज वाढदिवसानिमित्ताने आशुताोषवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र आशुतोष विषयी एक गोष्ट प्रेक्षकांपैकी अनेकांना कदाचित माहिती नसेल. ती म्हणजे आशुतोष हा एका प्रसिद्ध अभिनेत्याचा मुलगा आहे. 

आशुतोष हा प्रसिद्ध अभिनेते विजय गोखले यांचा मुलगा आहे. वडिलांकडूनच त्याला अभिनयाचा वारसा मिळाला. वडिलांप्रमाणेच आशुतोषलाही लोकप्रियता मिळतेय. एवआढच नाही तर आशुतोषने अभिनय क्षेत्रात एक वेगळी ओळख आता निर्माण केली आहे. याशिवाय अभिनेता दिग्दर्शक अद्वैत दादरकर हा देखील आशुतोषचा चुलत भाऊ आहे. 

सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड असलेल्या आशुतोषने नाटकांपासून सुरुवात केली. मात्र आशुतोषला अभिनयाआधी क्रिकेटची प्रचंड आवड होती. महाविद्यालयीन काळात तो नाटकांमध्ये भाग घेत असे. विविध नाटकांमध्ये आशुतोषने काम केलं आहे. त्यानंतर 'तुला पाहते रे' या मालिकेतून तो लोकप्रिय झाला.  या मालिकेत अभिनेता सुबोध भावे साकारत असलेल्या पात्राच्या भावाच्या भूमिकेत तो दिसला होता. 

'रंग माझा वेगळा' या मालिकेतून आशुतोष हा लीड कास्ट म्हणून समोर आला. एकीकडे दीपा जिच्या काळ्या रंगाचा अनेक जण द्वेष करतात तर दुसरीकडे डॉक्टर कार्तिक जो दीपाच्या प्रेमात पडतो. दोघांचं लग्नही होतं. दीपाचा द्वेष करणारी सासूनेही दीपाचा स्विकार केला आहे. मात्र मालिकेत आता असं वळण आलय की कार्तिक दीपाचा द्वेष करु लागलाय. दीपाच्या पोटात वाढणारं बाळ त्याच नसल्याचं तो सांगतोय. तेव्हा या मालिकेत पुढे काय पाहायला मिळेल याची उत्सुकता तर प्रेक्षकांना आहेच. मात्र सध्या मालिकेत आलेलंं वेगळं वळण आणि कार्तिकचं वेगळं रुप पाहायला मिळतय. आशुतोषने त्याच्या अभिनय कौशल्याने या पात्रात जीव ओतलाय. त्याला कार्तिकच्या भूमिकेत प्रेक्षकांची पसंती मिळतेय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive