By  
on  

'देवमाणूस'ची रंजक मर्डर मिस्ट्री, प्रसारित होणार 2 तासांचा विशेष भाग

एखाद्या व्यक्तिला आपण देवासमान मानत असू पण त्या व्यक्तिचा खरा चेहरा काही वेगळाच असेल तर ? असाच विषय घेऊन आली देवमाणूस ही मालिका. एक बोगस डॉक्टर त्याच्या स्वभावाना गावातल्या लोकांना भुरळ पाडतो. गावात देवमाणूस म्हणून ख्याती असलेल्या या डॉक्टरचा खरा चेहरा या मालिकेत हळूहळू उघड होताना दिसतोय. डॉक्टर अजित कुमार देव उर्फ देवी सिंगच्या भूमिकेत अभिनेता किरण गायकवाडचं प्रचंड कौतुक झालय. त्याने एक उत्तम खलनायक या मालिकेत साकारला आहे. 

मात्र आता सगळ्यांचं लक्ष लागलय ते मालिकेच्या नव्या वळणावर. आता ही मालिका एका निर्णायक टप्प्यावर आली आहे. डिम्पल आणि अजितची लगीनघाई आणि या लग्नात दिव्या काय ट्विस्ट आणते ? सरू आज्जी काय राडा करणार? डॉ. अजित कुमार देव उर्फ देवी सिंग सोबत डिम्पलला सुद्धा अटक होणार का? ह्या आणि अश्या अनेक प्रश्नांच्या उत्तराची उत्सुकता प्रेक्षकांना लागलीय. देवी सिंगच्या अटकेचा थरार यात लवकरच पाहायला मिळणार आहे. 

या वळणावर मालिकेत आता 2 तासांचा विशेष भाग पाहायला मिळणार आहे. या भागात या मालिकेतली रंजक मर्डर मिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. आजवर अजित ने केलेल्या सर्व गुन्ह्यांची कबुली तो डिम्पल कडे देणार आहे. येत्या रविवारी 30 मे रोजी हा 2 तासांचा विशेष भाग झी मराठी वाहिनीवर प्रसारित होईल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive