By  
on  

पाहा Photos : 'फ्रेंड्स रीयूनियन' साठी सेलिब्रिटी दिसले इतके उत्सुक, शेयर केले हे फोटो

फ्रेंड्स या मालिकेचे असंख्य चाहते आहेत. जगभरात या सिरीजचा मोठा चाहतावर्ग आहे. दहा सिझनची ही मालिका आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांचं आवडतं बनलं. याच फ्रेंड्सच्या रीयूनियनची सगळ्यांना उत्सुकता होती. भारतात 27 मे रोजी फ्रेंड्स द रीयूनियन प्रदर्शित करण्यात आला. यावेळी या रीयूनियनसाठी मराठी सेलिब्रिटीही चांगलेच उत्सुक दिसले.

बऱ्याच कलाकारांनी या रीयूनियनचा आस्वाद घेतला. यावेळी पुन्हा त्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. काही कलाकारांनी तर खास पोस्ट देखील केल्या आहेत. फ्रेंड्स मालिकेत त्या घरातील दरवाज्यावर टांगलेली जी फ्रेम आहे ती देखील फ्रेंड्स मालिकेची ओळखच बनली.

अशीच हुबेहुब फ्रेम अभिनेत्रई परी तेलंगकडेही आहे. परीने त्या फ्रेमसोबतचे फोटो शेयर करत फ्रेंड्स रीयूनियनविषयीची उत्सुकता सोशल मिडीयावर व्यक्त केली. 

लॉस एंजेलीस हॉलीवुडमध्ये वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओत फ्रेंड्सचा सेट आहे. फ्रेंड्सच्या चाहत्यांनी तिथे जाऊन अनेकदा फोटोही क्लिक केले आहेत. अभिनेत्री मिथिला पालकरही या सिरीजची प्रचंड मोठी चाहती आहे.

शिवाय मिथिलाने वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओतील फ्रेंड्सच्या स्टुडिओला भेट दिली आहे. याच स्टुडिओतील आठवणी मिथिलाने शेयर केल्या आहेत. या स्टुडिओतील फोटो तिने शेयर केले आहेत.

अभिनेत्री रसिका सुनीलही फ्रेंड्स सिरीजची चाहती आहे. ती देखील या रीयूनियनसाठी उत्सुक दिसली. रसिकानेही वॉर्नर ब्रदर्सच्या फ्रेंड्स स्टुडिओला भेट दिली आहे. रसिकाने या खास आठवणीचे फोटो शेयर केले आहेत.

फ्रेंड्स रीयूनियन पाहिल्यावर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेल्या या सिरीजच्या कलाकारांच्या रीयूनियनने अनेकांचे डोळे पाणावले असतील एवढं नक्की. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive