By  
on  

अमेय वाघची नवीन 'गर्लफ्रेंड' तुम्हाला माहित आहे का?

अमेय वाघने काही दिवसांपूर्वी 'मुलीसाठी नाव सुचवा' अशी पोस्ट इंस्टाग्राम वर पोस्ट केली होती. अमेयने ही पोस्ट टाकताक्षणी अमेयवर चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला. अखेर या पोस्ट मागील खरा अर्थ उलगडला असून अमेयने आपल्या आगामी चित्रपटासाठी ही प्रोमोशनची युक्ती वापरली. अमेयने नुकत्याचं आपल्या इंस्टाग्रामवर आपल्या आगामी चित्रपटाचं एक पोस्टर चाहत्यांशी शेयर केलं.

https://www.instagram.com/p/BxRaOWih7vZ/?utm_source=ig_web_copy_link

अमेयच्या या चित्रपटाचं नाव 'गर्लफ्रेंड' असं असून अमेय या चित्रपटात नचिकेत प्रधान ही भूमिका साकारत आहे. अमेय सोबत कोणती अभिनेत्री काम करणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

आपल्या वेगळ्या आणि मिश्कील पोस्टमुळे अमेय वाघचे सोशल मीडियावर असंख्य चाहते आहेत. ‘मला मदत हवीय तुमची! मुलीसाठी नाव सुचवा प्लीज!’ अशी पोस्ट अमेयने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती. त्यावेळी अमेयच्या घरी छोट्या पाहुण्यांचं आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु आपल्या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी अमेयने हा फंडा वापरला होता.

https://www.instagram.com/p/BxHiqV0ByWq/

'गर्लफ्रेंड' हे अमेयच्या आगामी चित्रपटाचं नाव असून उपेन्द्र सिधये हे या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive